शिवसेनेने असे वागायला नको होते : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर पटोले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरील उमेदवाराची लवकरच घोषणा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

मुंबई : पालघर लोकसभा निवडणुकीत माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र यांना शिवसेनेत प्रवेश देणे हे दुर्दैवी आहे. शिवसेनेने असे वागायला नको होते, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित यांना भाजपकडून पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळविल्याबद्दल फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. वनगा यांच्या मुलालाच भाजप उमेदवारी देणार होते. हे शिवसेनेला माहीत असूनही त्याला 'मातोश्री'वर नेण्यात आले. त्यांच्याशी संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने ठेवण्यात आले. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. पण शिवसेनेची ती पद्धत आहे. ही जागा भाजपची आहे. भाजपने ती जिंकली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपचे सर्व कार्यकर्ते जिंकण्याच्या हेतूने लढणार आहेत.

दरम्यान, खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर पटोले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरील उमेदवाराची लवकरच घोषणा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

Web Title: Shivsena did not want to do this says CM