भाजप पारदर्शकतेवरून शिवसेनेची कोंडी करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची पारदर्शक कारभारावरून भाजप कोंडी करणार आहे. भाजप मुंबईची कार्यकारिणी बैठक सोमवारी झाली. या बैठकीत भाजप विस्तार, वस्तू व सेवाकर याची माहिती, आगामी रणनीती यावर चर्चा करण्यात आली.

मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन या वेळी करण्यात आले. पारदर्शक कारभाराचा ठरावही मंजूर करण्यात आला. मुंबई शहराला भ्रष्टाचारविरहित कारभार देण्यासाठी भाजपचे नगरसेवक पहारेकरी म्हणून पुढील काळात काम करतील. भ्रष्टाचारविरहित कारभार व्हावा, असा इशारा मुंबई महापालिकेला राजकीय प्रस्तावाद्वारे देण्यात आला. यासाठी वेळ पडली तर भाजपचे नगरसेवक रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. आमच्यात कोणतेही सामंजस्य राहणार नाही, असेही या वेळी नमूद करण्यात आले.

Web Title: shivsena dilemma by BJP transparency