
ShivSena: "निवडणूक आयोगाला 'तो' अधिकार नाही" संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
उद्धव ठाकरेंच्या गटाचे महाराष्ट्रभर शिवगर्जना मेळावे सुरू आहे. हे असतानाच आज उद्धव ठाकरे यांचा कोकणातील खेडमध्ये जाहीर मेळावा होणार आहे. यावर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी शिवगर्जनांच्या माध्यमातून मेळावे पार पडले यात लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
आज खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे. ही सभा अतिविराट अशी होईल. कोणक हा शिवसेनेचा कायम पाठीराखा राहिला, शिवसेनेच्या वाढीमध्ये कोणाचा मोठा वाटा आहे.
उद्धव ठाकरे खेडच्या मेळाव्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी जातील. खेडनंतर दुसरी सभा मालेगावमध्ये होईल. पक्षातून निघून गेलेल्यांमुळे पक्षावर काहीच परिणाम झाला नाही. बंडखोरांना कागदावर पक्ष चिन्ह आणि नाव मिळालं पण शिवसैनिक आणि जनता मिळाली नाही.
निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही, जनता आणि शिवसैनिकांना सुपूर्त करण्याचा हा कागदावरचा निर्णय आहे. तो कागदावरत राहील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान काल शिवगर्जना मेळावा हिंगोली औंढा नागनाथ येथे पार पडला यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले खासदार संजय (बंडू) जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांना घरचा आहेर दिला.
शिवगर्जना मेळाव्या दरम्यान ते बोलत होते यावेळी ते म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मुलाला मंत्री करायला नको होत. तुम्ही दोघे मंत्री झाल्यामुळे एकनाथ शिंदेना वाटलं उद्या बाप गेल्यानंतर पोरगं माझ्यावर **बसल.
त्यापेक्षा मीच वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं या भूमिकेत शिंदे यांनी बंडखोरी केली असं खासदार संजय (बंडू) जाधव म्हणाले. जाधव यांच्या या विधानानंतर ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.