पुढच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच; भाजप-सेना युती राहणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

शिवसेनेचा आज (ता. 19) वर्धापन दिन असून, शिवसेनेने सामना या मुखपत्रातून पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे म्हटले आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुणे असणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेनेने अग्रलेखातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असे म्हटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती राहिल की नाही याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल, असा निर्धार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेचा आज (ता. 19) वर्धापन दिन असून, शिवसेनेने सामना या मुखपत्रातून पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे म्हटले आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुणे असणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेनेने अग्रलेखातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असे म्हटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती राहिल की नाही याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तरसंपूर्ण जगाने गेल्या 53 वर्षांत अनुभवले आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी 19 जून हा भाग्याचाच दिवस मानावा लागेल. याच दिवशी शिवसेना नामक एका वादळाचा जन्म झाला. वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ 52-53 वर्षे सतत घोंघावत आहे. शिवसेनेचा स्थापनेपासूनचा इतिहास निदान नव्या पिढीने तरी समजून घेतला पाहिजे. स्थापनेच्या वेळचे ज्वलज्जहाल वातावरण आज महाराष्ट्रात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या 50 वर्षांची आहुती दिली तो त्याग, संघर्ष, चढ-उतार नव्या पिढीने पाहिले नाहीत. पण शिवसेनेने चार पिढय़ा निश्चितच घडवल्या व शिवरायांचा भगवा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीच्या हाती जात आहे हे महत्त्वाचे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या. मराठी माणूस हा या जगाचा एक घटक आहे. हिंदुस्थानचा अभिमानी आहे. हिंदू संस्कार आणि संस्कृतीचा तो रक्षक आहे, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी बाणा जपणारी मंडळी शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते नव्हते. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. राष्ट्रद्रोही, मग ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना या देशात थारा नाही हे त्यांचे हिंदुत्व. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena eyeing Maharashtra CM post next year