उगाच छाती का फुगवता?; शिवसेनेचा भाजपला प्रश्न

उगाच छाती का फुगवता?; शिवसेनेचा भाजपला प्रश्न

मुंबई- आगामी निवडणुकांसाठी सेना आणि भाजपमध्ये युती असली तरी अजूनही त्यांच्या कुरघोड्या चालूच आहेत. सामनाच्या संपादकीय लेखामधून शिवसेनेने भाजपवर आज जोरदार टीका केली आहे.  भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईचं श्रेय घेण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन शिवसेनेने भाजपवला टीकेचे लक्ष केले आहे.

'आमच्या जवानांची बलिदाने आम्ही थांबवू शकलो नाही, पण त्यांचे गणवेश घालून राजकीय प्रचार करीत आहोत. याच जवानांचे गणवेश रक्ताने माखलेले, अतिरेक्यांच्या बॉम्बहल्ल्यात छिन्नविच्छिन्न झालेले देशाने पाहिले आहेत. सैनिकांचा सन्मान त्यांच्या शौर्यात आणि वर्दीत आहे. या वर्दीचा वापर करून निवडणूक प्रचारात मते मागू नका असे निवडणूक आयोगाला सांगावे लागले हे लक्षण चांगले नाही, असे या संपादकीय लेखातून सांगण्यात आले आहे.

सैनिकी कारवाईचे पुरावे मागणारे दोषी आहेत, तितकेच सैनिकांचे गणवेश, छायाचित्र वापरून मतांचा जोगवा मागणारे दोषी आहेत', अशा शब्दांमध्ये भाजपचा समाचार घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रभक्ती ही काही एका व्यक्तीची किंवा राजकीय पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही. तसे कुणाला वाटत असेल तर ते देशवासीयांचा अपमान करीत आहेत. एकमेकांच्या राजकीय भूमिका पटत नसतील; पण विरोध करणारे, प्रश्न विचारणारे देशद्रोही हा अपप्रचार असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

पाकव्याप्त कश्मीरमधील हवाई हल्ल्यानंतर सैन्य, देशभक्ती व इतर राष्ट्रीय विचारांवर मालकीहक्क सांगण्याचे प्रकार वाढीस लागले. पुलवामाचा बदला सैनिकांनी नव्हे तर आम्हीच घेतला अशी पोस्टर्स राजकीय पक्षांनी लावली. अभिनंदनने आपल्या मिग विमानाने पाकड्यांचे एफ-16 पाडले ते भाजप सरकार सत्तेत असल्यामुळेच असले प्रसिद्धी प्रयोग सर्रास सुरू झाले, असल्याचेही म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com