आदित्य ठाकरेंची पुणेकरांना कोपरखळी, आधी पुणेकरांना...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

पुण्यातील सर्व व्यवहार दुपारी बंद असतात, यावरून आदित्य ठाकरेंनी ही कोपरखळी मारली. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणेकरांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे म्हटले होते. 

मुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पुण्यातील नाईट लाईफ विषयी विचारले असता त्यांनी पुणेकरांना कोपरखळी मारत आधी पुणेकरांसाठी आफ्टरनून लाईफ सुरु करावी लागेल असे म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफ या महत्त्वाकांक्षी विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. 27 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार असून, सुरवातीला काही अटी असणार आहेत. आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

मुंबई @24×7; 27 जानेवारीपासून जगा 'नाईट लाईफ'

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाईफविषयी माहिती दिल्यानंतर त्यांना पत्रकारांनी पुण्यातील नाईट लाईफ विषयी प्रश्न विचारला. यावर आदित्य यांनी हसत-हसत उत्तर देत म्हटले, की पुण्यात आगोदर आफ्टरनून लाईफ सुरु करायला हवी. पुण्यातील सर्व व्यवहार दुपारी बंद असतात, यावरून आदित्य ठाकरेंनी ही कोपरखळी मारली. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणेकरांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Aditya Thackeray talked about night life in Pune