एकनाथ शिंदे : सामान्य शिवसैनिक ते ठाकरे सरकारमधील मंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. २८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पुणे : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. २८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास बघितल्यावर थक्क करणारा आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून शिवसेनेच्या विविध आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला तुरुंगवासदेखिल भोगला आहे. कर्नाटक सीमेवरील बेळगांव येथे शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमार त्यांनी आनंदाने झेलला बेळगांव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी ऐन तारुण्याच्या उंबरठयावरच कारावास सहन केला.

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवेला त्यांनी आदर्श मानले तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेमुळे ते शिवसेनेसोबत जोडले गेले. शाखाप्रमुख म्हणून किसन नगर नं.२ची शाखा त्यांनी मोठया जिद्दीने बांधली आणि सहका-यांसह अधिक जोमाने गणेशोत्सव, दहीहंडी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, हुषार विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वहया पुस्तके यांचे गरजु विद्यार्थ्यांना वाटप आणि कित्येक सामाजिक उपकमांचे आयोजन यशस्वीपणे केले आहे.

एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास

 • १९९७ - पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसवेक
 • २००१ - ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड
 • २००२ - ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी दुसऱ्यांदा निवड
 • २००४- महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारपदी पहिल्यांदा निवड
 • २००५- ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड
 • २००९- महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारपदी दुसऱ्यांदा निवड
 • २०१४- महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारपदी तिसऱ्यांदा निवड, 
 • २०१४- राज्यात अल्पमतातील भाजप सरकार अस्तित्वात आल्यावर विरोधीपक्षनेतेपदी निवड
 • २०१४- शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती
 • २०१४- ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
 • २०१८- शिवसेना नेते पदी नियुक्ती
 • २०१९ - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त
 • २०१९- महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारपदी सलग चौथ्यांदा निवड
 • २०१९- शिवसेना गटनेतेपदी निवड

  Image may contain: 1 person, beard


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Eknath Shinde Political Journey in maharshtra