esakal | राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena leader sanjay raut press conference after he meets governor of maharashtra

राज्यात सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही, असे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना सांगितले.

राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही, असे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना सांगितले. राज्यातील सरकार स्थापनेचा निर्णय गेले दहा दिवस होत नसल्याने सर्वत्र अस्वस्थता आहे. अशा अस्थिर वातावरणात शिवसेना राज्यपालांकडे कोणती भूमिका मांडणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. 

रावसाहेब दानवेंनी दिला सत्ता स्थापनेसाठी 'हा' फॉर्म्युला

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनात पत्रकारांशी राऊत, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, शिवसेनेने सरकार स्थापनेबाबत कोणतीही भूमिका मांडलेली नाही. राज्य घटनेनुसार राज्यपाल भगत सिंग कोश्यारी योग्य ती भूमिका घेतील, असे राऊत यांनी सांगितले.

जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल नितीन गडकरी घेतात...

राऊत म्हणाले, की राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्रात घटनेला धरूनच काम झाले आहे. त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे हे पुस्तक, तसेच उद्धव ठाकरे यांनी लिहिलेली दोन पुस्तके भेट दिली.

राऊत म्हणाले, की राज्यपाल हे अनुभवी असून, त्यांना राजकारणाची, देशाची चांगली जाण आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. राज्यसरकार स्थापनेला शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही. राज्यसरकारची स्थापना लवकर व्हावी, असे आम्ही त्यांना सांगितले.