मुख्यमंत्रीपदाबाबत आमच ठरलंय : संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत. भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही. सत्तेत अधिकाराचा समसमान वाटप आहे.

मुंबई : शिवसेना आणि भाजपत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून, सगळे व्यवस्थित चालू आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे ठरले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनेने आज (मंगळवार) सामना या मुखपत्रातून अग्रलेख लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, की मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत. भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही. सत्तेत अधिकाराचा समसमान वाटप आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात जे ठरलेल आहे, त्यानुसार पुढच्या सर्व गोष्टी घडतील. कोण कुणाला कशासाठी भेटते याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Sanjay Raut talked abotu CM post in Maharashtra