Sanjay Shirsat: "संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे...", रूपाली ठोंबरे यांचे घणाघाती पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat: "संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे...", रूपाली ठोंबरे यांचे घणाघाती पत्र

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. संजय शिरसाट यांच्या या व्यक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी यासंबधी एक पत्र लिहीत संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रूपाली ठोंबरे-पाटील यांचं पत्र

संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत

----------------------------------------

एडवोकेट रूपाली पाटील ठोंबरे

नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस

संजय शिरसाट हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते.

सुषमाताई अंधारे या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे.

याउलट संजय शिरसाट आत्ता जिथे आहेत तिथे असणारे पुरुष राजकारणी हे कायम महिलांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत बोलतात मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील . तर तिथे असणाऱ्या महिला या कायम नंगट, हरामखोर, थोबडवून काढीन, सटवी, चपलाने मारेल, दांडा, ढुं* अशी गलिच्छ भाषा आणि शब्दप्रयोग करतात. त्यामुळे शिरसाट यांना चांगलं बोलायची आणि चांगलं ऐकायची मुळात सवयच नाही.

शिरसाट जेव्हा लफड्यांची वगैरे भाषा वापरतात तेव्हा ते त्यांची वैचारिक लायकी काय आहे हे जगाला दाखवतात. शिरसाट यांची संभाजीनगर मधली ख्याती अशी आहे की सिरसाठ यांना कोणीही घरात निमंत्रण देत नाही कारण शिरसाटांची नजर इतकी पापवासनेने भरलेली असते की घरातल्या लेकी बाळींना शिरसाठानी भेटावे असे कुणालाही वाटत नाही.

मुळात शिरसाटानी स्वतःच्या अंतरंगात जरा डोकावून बघावे आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यावी .

१) संभाजीनगर मध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते?

२) व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटाकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाठ यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती?

3) अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटानी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते.

4) दोन अडीच महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्स ने संभाजीनगर वरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ?

शिरसाट माझं तोंड उघडू नका

आणि आता शेवटचा प्रश्न सुषमाताई अंधारे या रामा इंटरनॅशनल ला उतरतात की ताज हॉटेल ला उतरतात ही ओबेराय हॉटेलला उतरतात की त्या लाखो शिवसैनिकांच्या लेक आणि बहीण म्हणून त्यांच्या काळीज कप्प्यात राहतात हा मिंदे गटातल्या गद्दारांचा प्रश्न असू शकत नाही. त्यांच्या राहण्या खाण्याची काळजी आणि खर्च करण्यासाठी त्यांचा पक्ष अत्यंत खंबीर आहे मिंधे गटातल्या गद्दारांनी फार फार तर खोक्यांमधून मिळालेल्या पैशांनी गुवाहाटीच्या सहली कराव्यात आणि आयत्या पिठावर रेगोटे उडत लोकांच्या कष्टाच्या घामातून मिळालेल्या पैशावर ऐश करत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असे म्हणत बसावे.

शिरसाट हा तुम्हाला अत्यंत आपुलकीचा सल्ला वजा इशारा आहे. सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या कायद्याने चालणाऱ्या आणि शून्यातून स्वतःचे ओळख उभी करू पाहणाऱ्या महिलेला एकाकी समजून जर तुम्ही गलिच्छ पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ महाराष्ट्रातल्या तमाम जिजाऊ सावित्रीच्या लेकींशी आहे.. !!!

-एडवोकेट रूपाली पाटील ठोंबरे नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस

काय बोलले होते संजय शिरसाट?

सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.

तसेच, शिरसाट यांनी दावा केला की ठाकरे गटानेच नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी मला फोन केला. म्हणे ती बाई (सुषमा अंधारे) डोक्याच्या वर झाली आहे.