All Done म्हणत सेना नेते राजभवनाला पोहोचले; काँग्रेसचंही पत्र आलं!

सकाळ वृत्तसेवा | Monday, 11 November 2019

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा तिढा संपला असे स्पष्ट होत असून All Done म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसचंही पत्र आलं आहे मात्र पाठींबा आतून की बाहेरून हे अजून ठरलेलं नाही, असे सांगण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा तिढा संपला असे स्पष्ट होत असून All Done म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसचंही पत्र आलं आहे मात्र पाठींबा आतून की बाहेरून हे अजून ठरलेलं नाही, असे सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेच्या नेत्यांसबोबत राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे नेतेही सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राजभवनाला येणार असल्याची माहिती सांगण्यात आली होती. परंतु हा सत्ता स्थापनेचा संघर्ष संपलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेनेला सत्तास्थापन करण्यास शिवसेनेला पाठिंबा देण्यावर काँग्रेस पुर्णपणे अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज (ता.11) सत्तास्थापनेचा हा संघर्ष संपेणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस नेते के.सी.पाडवी, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा करून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी अनुकूलता दर्शविली असल्याची चर्चा आहे.