'शिवसेनेने मराठी माणसाला लुटलं'

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी माणसाला त्यांनी लुटलं''.

- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी माणसाला त्यांनी लुटलं, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला. 

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. तरीदेखील या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावर आता दमानिया यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना(बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. याचा प्रत्यय गिरणी कामगार, खांबटा कामगार आणि आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. मराठी-मराठी म्हणत मराठी माणसाला लुटलं. सगळ्या कामगार युनियनने त्यांचा बहिष्कार केला पाहिजे'', असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Shivsena looted Marathi people says Anjali Damania