शिवसेनेच्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - भाजप-शिवसेना युतीने लोकसभा निवडणूक जिंकल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अभिनंदन केले. यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते हे फडणवीस यांच्यासाठी भला मोठा हार घेऊन आले होते. युतीच्या मंत्र्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीला सर्व सदस्यांनी हजेरी लावली. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. रावते यांनी फुलांचा मोठा हार आणला होता. तो मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात घातल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून फडणवीस यांचे अभिनंदन केले.

बापट यांना निरोप आणि शुभेच्छा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट पुणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्याने मंत्रिमंडळ सदस्यांनी त्यांना पेढा भरवून निरोप दिला. तसेच लोकसभेतील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. गिरीश बापट लोकसभेवर निवडून आल्यामुळे लवकरच ते मंत्रिपद आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. राजीनामा देण्यापूर्वी आणखी एखादी मंत्रिमंडळ बैठक झाली, तर ते हजरही राहतील. मात्र, आजच त्यांना निरोप दिल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com