...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

भाजप-शिवसेना युती होऊ अद्याप दोन दिवसही झालेले नाही, तेच सत्तेवरून युती तोडण्याची भाषा सुरू झाली आहे. कदम म्हणाले, 'मी काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल, असे ते म्हणाले. मात्र, हे चुकीचे आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी बातचित करुन वक्तव्य करावे. नाहीतर असे व्हायचे, की युती झाली आणि काहीतरी उलटसुलट बोलल्यामुळे पुन्हा युती तुटायची. भाजपने अट मान्य केली नाही, तर आम्ही उद्धव ठाकरेंना सांगू की युती तोडून टाका.'

रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, निवडणुकांच्या तोंडावर झालेली युती, गेल्यावेळी प्रमाणे निवडणुकांनंतर तुटणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Shivsena minister Ramdas Kadam warns of breaking alliance, if BJP does not allow senas chief minister for half term