शिवसेना आमदारांची ‘विकास निधी’कोंडी..!

मंगळवार, 10 जुलै 2018

नुकतीच या शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्याची या प्रलंबित विकास निधीसंदर्भात भेट घेतली. मात्र केवळ दहा मिनिटांत मुख्यमंत्र्यानी आमदारांची बोळवण केल्याचे सुत्रांनी सांगितले. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजप विरोधात स्वबळावर लढण्याचा आदेश दिलेला असताना दुसर्या बाजूला मतदारसंघात विकास कामांसाठीचा विशेष निधीच मिळत नसल्याने सेना आमदारांमधे अस्वस्थता आहे. त्यातच शिवसेना मंत्री देखील याबाबत मंत्रीमंडळात आवाज उठवत नसल्याने शिवसेना आमदारांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

नागपूर : सत्तेत असतानाही परस्परांवर राजकिय कुरघोडी करणाऱ्या भाजप-शिवसेना युतीत मित्रत्वाची दरी रूंदावत आहे. सत्तेतल्या शिवसेनेला समाधानी ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यानी प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आमदारांना विकास कामांसाठी दहा कोटी विशेष विकास निधीचा दिलेला शब्द पाळला नसल्याने शिवसेना आमदार हतबल झाले आहेत. शिवसेनेच्या स्वबळाच्या निर्धारानंतर भाजपने मनोमिलनाचा ‘लालगालिचा’ टाकलेला असला तरी शिवसेना आमदारांना मात्र मतदार संघातल्या विकास कामांच्या विशेष निधीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरे जिझवावे लागत आहेत. 

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात शिवसेना व भाजपात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. शिवसेनेला सत्तेत सोबत ठेवताना समाधानी राहील यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्या सोबत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली होती. यामधे शिवसेना आमदारांना मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी विशेष दहा कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी प्रत्येक शिवसेना आमदाराला कामांची यादी देण्याचा निरोप दिला. त्यानुसार आमदारांनी संधीचा लाभ घेण्यासाठी तातडीने आपापल्या मतदारसंघातील कामांची यादी व प्रस्तावित खर्चाची माहिती शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली. मात्र अद्याप पर्यंत एकाही आमदाराला या तहानुसार विकास निधी मिळालेला नसल्याने शिवसेना आमदार हतबल झाले आहेत. 

नुकतीच या शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्याची या प्रलंबित विकास निधीसंदर्भात भेट घेतली. मात्र केवळ दहा मिनिटांत मुख्यमंत्र्यानी आमदारांची बोळवण केल्याचे सुत्रांनी सांगितले. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजप विरोधात स्वबळावर लढण्याचा आदेश दिलेला असताना दुसर्या बाजूला मतदारसंघात विकास कामांसाठीचा विशेष निधीच मिळत नसल्याने सेना आमदारांमधे अस्वस्थता आहे. त्यातच शिवसेना मंत्री देखील याबाबत मंत्रीमंडळात आवाज उठवत नसल्याने शिवसेना आमदारांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

Web Title: ShivSena MLA development Fund not distribute BJP government