मराठा जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस: शिवसेना आमदार प्रभू 

मंगळवार, 10 जुलै 2018

आर्थिक दुर्बलता व बेरोजगारीत अडकलेल्या मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण द्यावे. त्यासोबत धनगर समजालाही आरक्षणाचा लाभ द्यावा. असे प्रभु यांनी यावेळी स्पष्ट केले.  

नागपूर : पुर्वी उत्तम स्थितीतला मराठा समाज आज जाॅबलेस, लॅण्डलेस व पाॅवरलेस झाला आहे. मराठा समाज आर्थिक दुर्बल असल्याचे शेकडो पुरावे समोर आहेत. पण सरकार मात्र मराठा आरक्षणाच्या निर्णयात फारसे गंभीर दिसत नाही. अशी खंत व्यक्त करत शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या. अशी हाक आज विधानसभेत दिली.

सामाजिक न्यायच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेत ते बोलत होते. मराठा समाजासोबतत धनगर समाजालाही आरक्षण देण्याची मागणी प्रभू यांनी यावेळी केली. 

मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने तीन वर्षापुर्वीच मान्य केला. त्यासाठी मागास वर्ग आयोग नेमला. राज्यभरात सुनावण्या झाल्या. पण न्यायालयाने ज्यावेळी आरक्षणाला दिरंगाई होत असल्याने सरकारला फटकारले तेंव्हा सरकारच्या हालचाली तीव्र झाल्याचा दावा केला जातो आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज कुठपर्यंत आले आहे याची माहिती सरकारने विधानसभेत द्यावी अशी मागणी प्रभू यांनी केली. 

आर्थिक दुर्बलता व बेरोजगारीत अडकलेल्या मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण द्यावे. त्यासोबत धनगर समजालाही आरक्षणाचा लाभ द्यावा. असे प्रभु यांनी यावेळी स्पष्ट केले.  

Web Title: ShivSena MLA Sunil Prabhu talked about Maratha reservation