मातोश्रीला पोलिस छावणीचं स्वरूप; आमदारांची बैठक सुरू

मिलिंद तांबे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

9 नोव्हेंबर रोजी या सरकारची मुदत संपत असल्याने नवीन सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्रीपद दिल्याशिवाय भाजप सोबत न जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना - भाजप मधील नाट्यमय घफमोडींच्या क्लायमॅक्ससाठी आता केवळ दोन दिवस उरले असल्याने या दोन दिवसात कोणतीही चूक होऊ नये यासाठी शिवसेना पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे.

मुंबई : राज्याचा मुख्यमंत्री कोण यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज (गुरुवार) शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसायचं की उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठक सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मातोश्रीबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे मातोश्रीला पोलिस छावणीचे स्वरूप आलं आहे. मातोश्रीमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिस कसून तपासणी करत आहेत.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

9 नोव्हेंबर रोजी या सरकारची मुदत संपत असल्याने नवीन सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्रीपद दिल्याशिवाय भाजप सोबत न जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना - भाजप मधील नाट्यमय घफमोडींच्या क्लायमॅक्ससाठी आता केवळ दोन दिवस उरले असल्याने या दोन दिवसात कोणतीही चूक होऊ नये यासाठी शिवसेना पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे. सरकारमध्ये सहभागी होण्यावरून शिवसेना आमदारांमध्ये ही दोन गट आहेत.काही आमदार मुख्यमंत्रीपदावर अडून आहेत तर काही आमदार भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक आहेत. यामुळे बैठकीत ही वातावरण तापण्याची शक्यता आहे.यातच भाजप आपले आमदार गळाला लावेल या भीतीने शिवसेनेने आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे.

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने एकमेकांचे आमदार गळाला लावण्याची भीती आहे. 9 नोव्हेंबर रोजी या सरकारची मुदत संपत असल्याने नवीन सरकार बनवण्यासाठी भाजपला बहुमताची गरज आहे.यासाठी भाजप आपल्या काही आमदारांना आमिष देऊन आपले आमदार फोडतील असा संशय शिवसेनेला आहे. यामुळे शिवसेनेने योग्य ती खबरदारी घेत आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवरील बैठकी नंतर सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे समजते. केवळ आमदार फुटू नये यासाठी नव्हे तर आपला आमदार कुणाच्याही संपर्कात येऊ नये, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये यासाठी शिवसेनेकडून ही खबरदारी घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLAs meeting starts at Matoshree in Mumbai