लोकशाहीची हत्या झाली; पण.. : संजय राऊत

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत सिद्ध करणे कठीण आहे. ज्या पक्षांकडे बहुमत आहे, अशांना राज्यपालांनी बोलवायला हवे होते.

नवी दिल्ली - देशात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्यावरून नागरिक म्हणत आहेत लोकशाहीची हत्या झाली. पण, देशात लोकशाही राहिलीच कोठे आहे हत्या होण्यासाठी, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

कर्नाटकमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात भाजपने बाजी मारली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे. येडियुरप्पा यांना 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यावरून देशभरातील नेत्यांकडून भाजप व केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, की देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत सिद्ध करणे कठीण आहे. ज्या पक्षांकडे बहुमत आहे, अशांना राज्यपालांनी बोलवायला हवे होते. पण जेव्हा असे होते तेव्हा लोक म्हणतात लोकशाहीची हत्या झाली.

Web Title: ShivSena MP Sanjay Raut criticize BJP