Sanjay Raut : योगींच्या रोडशोवर संजय राऊत यांचा आक्षेप, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : योगींच्या रोडशोवर संजय राऊत यांचा आक्षेप, म्हणाले...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त आज योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो करणार आहेत. यावेळी योगी स्वतः मुंबईतील या रोड शोचे नेतृत्व करणार आहेत. या रोड शो दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेणार आहेत. सिने जगतातील लोकांचीही भेट घेणार असून, नोएडामध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबाबत चर्चा करणार आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले योगी आदित्यनाथ यांना रोड शो करण्याची गरज काय आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. ते सन्मानाने आले आहेत त्यांनी सन्मानाने परत जावं. चर्चा करा. तुमच्याबद्दल आदर आहे. तो आदर आणि प्रेम राहिलं. शक्यतो हे राजकीय उद्योग इथे करू नका. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो का? असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा: Cyrus Mistry Accident Updates: मिस्त्रींच्या मृत्यूला डॉ. अनाहिता जबाबदार?

जर योगी आदित्यनाथ फिल्म इंडस्ट्री कोणी घेऊन नाही जाऊ शकत. त्यांना हाव तर त्यांनी सिनेमा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा यामुळे देशाच्या विकासासाठी मदत होईल. त्यांना मुंबईत येऊन रोड शो करण्याची गरज काय आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना केला आहे. जर ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आले असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला. उद्योगपतींशी बोला. तुमच्या राज्याचा विकास करण्यासाठी आलेला आहेत तर त्यांना भेटा चर्चा करा रोड शो कशासाठी इथ तुमची राजकीय नीती वापरू नका असंही ते म्हणाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा: NCP: धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असं राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे.

तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचं योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला आहे.