Sanjay Raut : लवकरच बाहेर येईन; खडसेंना जाता-जाताच भेटत राऊतांनी दिला विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse Sanjay Raut
Sanjay Raut : लवकरच बाहेर येईन; खडसेंना जाता-जाताच भेटत राऊतांनी दिला विश्वास

Sanjay Raut : लवकरच बाहेर येईन; खडसेंना जाता-जाताच भेटत राऊतांनी दिला विश्वास

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आज न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. यावेळी आपण लवकरच बाहेर येऊ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला

एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी राऊत आणि खडसेंमध्ये औपचारिक चर्चा झाली. खडसे म्हणाले की, आत्ताच गेटवर संजय राऊत यांची भेट झाली. आपण लवकरच जेलमधून बाहेर येऊ, असं त्यांनी सांगितलं. आतमध्ये सगळं ओके आहे. आत्ताच बाहेर येतो. चिंता करू नका, मी लवकरच बाहेर येणार आहे. काळजी करू नका.

हेही वाचा: Rohit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडायचं भाजपाचं टार्गेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

संजय राऊत यांच्या जेलमधील मुक्काम वाढला आहे. आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होती पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर आता 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.