ठरलं तसंच होईल; नवीन प्रस्तावावर चर्चा नाही : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सध्या उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या नुकसानीची दखल घेत आहे. शेतकरीही शिवसेनेकडे आशेने बघतात. त्यांनाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे.

- संजय राऊत

मुंबई : 'महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांना आधार देत आहेत. गावागावांत गेल्यावर शेतकरीही सांगत आहेत की, शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. त्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही', असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 6) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच निवडणूकीपूर्वी ठरलेल्या प्रस्तावाप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील, नवीन प्रस्तावावर चर्चा होणा नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

फॉर्म्युला ठरला! मुख्यमंत्रीपद नाही पण एवढी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार?

सध्या उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या नुकसानीची दखल घेत आहे. शेतकरीही शिवसेनेकडे आशेने बघतात. त्यांनाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा आहे. लोकसभा निवडणूकी वेळी ठरलं होतं तसंच होईल. समसमान फॉर्म्यूला व मुख्यमंत्रीपदाबाबत समसमान वाटप व्हावं. सुरवातीला ठरलेल्या प्रस्तावाप्रमाणेच अंमलबजावणी व्हावी. कोणत्याही नवीन प्रस्तावावर चर्चा होणार नाही, असे राऊत यांनी यांनी ठणकावून सांगितले. तसेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास ती आमची जबाबदारी नसेल, तर तो महाजनादेशाचा अपमान असेल असे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड नाही; भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय

संजय राऊतांनी आज पुन्हा केले ट्विट
महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आज (बुधवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है, असे सूचक विधान केले आहे. मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीपदे तुम्ही घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे सांगून संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपची नव्याने कोंडी केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेची बाजू मांडली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. सातत्याने भाजपवर हल्ला करणाऱ्या राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे लोक काहीच करत नाहीत, ते खरंच कमाल करतात. राऊत यांनी नक्की काय म्हणायचे आहे, यावरून तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

वो लोग कमाल करते है : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut speaks on government forming at PC