शरद पवार बोलले त्यात चुकीचं काय? : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सुमारे 15 मिनिटे चर्चा केल्यानंतर सांगितले, की मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे.

मुंबई : '105 ज्यांचा आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं. शरद पवार जे काही बोलले त्यात काही चूक नाही,' असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केले. आज (ता. 6) सकाळी संजय राऊत यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानावर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे सत्ता समीकरण बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद पवारांच्या विरोधी पक्षात बसण्याच्या निर्णयामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड नाही; भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय

विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना व भाजपची रस्सीखेच सुरू होती. शिवसेना समसमान फॉर्म्यूलावर ठाम आहे, तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. या सगळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का या चर्चांना उधाण आले होते. मात्र, 'आम्ही जबाबदार विरोधी पक्षाचे काम करू' असे म्हणत शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

sanjay-raut.jpg

वो लोग कमाल करते है : संजय राऊत

राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सुमारे 15 मिनिटे चर्चा केल्यानंतर सांगितले, की मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे.

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट

संजय राऊतांनी आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी अनेक पर्याय आहेत, असे म्हणले होते, मात्र राष्ट्रवादीने त्यांना कोणतेच आश्वासन दिले नव्हते. याबाबत पवारांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, मी ही शोधतोय की, संजय राऊतांकडे आणखी कोणते पर्याय होते. या सर्वात भाजप मात्र मौन पाळून बसले आहे, असे दिसते. या सर्व घडामोडींमुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे बडे नेते म्हणतात, झाले गेले विसरून एकत्र येऊ

संजय राऊतांनी आज पुन्हा केले ट्विट
महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आज (बुधवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है, असे सूचक विधान केले आहे. मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीपदे तुम्ही घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे सांगून संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपची नव्याने कोंडी केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेची बाजू मांडली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. सातत्याने भाजपवर हल्ला करणाऱ्या राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे लोक काहीच करत नाहीत, ते खरंच कमाल करतात. राऊत यांनी नक्की काय म्हणायचे आहे, यावरून तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू : शरद पवार

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे. तर, शिवसेना ही आगोदर ठरल्याप्रमाणे समसमान वाटप व्हावे अशी मागणी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut speaks on Sharad Pawar Press conference