पालघरमध्ये 2019 ला आम्हीच जिंकणार: संजय राऊत

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती.

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हा भाजपने स्वबळावर मिळाविलेला नसून, हा निवडणूक आय़ोगाचा विजय आहे. 2019 मध्ये पालघरमध्ये आम्हीच जिंकणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराची राळ उडविली होती. आता भाजपने याठिकाणी यश मिळविल्याने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. 

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, की हा भाजपचा नाही निवडणूक आयोगाचा विजय आहे. आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. पालघरमध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखविली. मतविभाजनामुळे भाजपला फायदा झाला. आमची लढाई साम, दाम, दंड भेद विरोधात होती. याठिकाणी 2019 मध्ये आम्हीच जिंकणार. 

Web Title: ShivSena MP Sanjay Raut statement about Palghar Loksabha bypoll and BJP