esakal | भाजपनं आता धक्क्यातून सावरायला हवं : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणारच होते. तीन पक्षांचा सरकार आहे त्यामुळे काहीसा वेळ लागला. शनिवारचा एक दिवस राज्यपालांनी वाया घालविला.

भाजपनं आता धक्क्यातून सावरायला हवं : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपने प्रतिक्रिया देणं नवीन नाही. ज्योतिष मांडण्याचा काम भाजपने करू नये. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी ठरवतील सरकार चालेल की नाही. भाजपने किती पण प्रयत्न केला तरी सरकार हे चालणारच. भाजपने आता धक्क्यातून सावरायला हवे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज (रविवार) सहा दिवसांनी खातेवाटप झाले आहे. सर्व मंत्र्यांना खात्याचे वाटप झाले असून, उद्या हे सर्व पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. या खातेवाटपाविषयी व भाजपविषयी संजय राऊत यांनी वक्तव्ये केली आहे.

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

संजय राऊत म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणारच होते. तीन पक्षांचा सरकार आहे त्यामुळे काहीसा वेळ लागला. शनिवारचा एक दिवस राज्यपालांनी वाया घालविला. प्रत्येक खात्याला महत्त्व आहे. एक स्वतंत्र मंत्री त्याला दिलाय मग नाराजी नाहीच. पण अब्दुल सत्तार नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं नाही. जर, राजीनामा दिला असता तर तो राज भवनात आणि मुख्यमंत्री कार्यालयात जातो जो आली नाही.

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

ऑपरेशन लोटस वगैरे असले काही नसते. ऑपरेशन थिएटर आमच्याकडेही आहे, आम्ही कुणालाही ऑपरेशनसाठी झोपवू शकतो. चिरफाड करण्याचा आम्हाला चांगला अनुभव आहे. त्यांना आवाहन आहे, की तोडण्याचा प्रयत्न करून पाहावा. त्यांचा वेळ जात नाही म्हणून काहीतरी मनात येत आहे. सत्ता जाते तेव्हा धक्का लागणारच. केंद्रात मजबूत यंत्रणा, आर्थिक ताकद असून सत्ता मिळाली नाही हा धक्काच आहे. पण त्यांनी धक्क्यातून सावरायला हवं, असे राऊत यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कृषीमंत्री! 
चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद