Sanjay Raut : राऊतांनी फोटो ट्वीट केलेल्या पीडित मुलीसोबत काय घडलं? 

या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
sanjay raut
sanjay raut Esakal

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एका मुलीचा फोटो ट्वीट केला होता. या फोटोवरुन आता त्यांच्यावर बार्शीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पण त्या पीडित मुलीसोबत नक्की काय घडलं होतं? जाणून घ्या...

बारावीचा पेपर देऊन घरी येणार्‍या मुलीला रस्त्यात अडवून दोन नराधमांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. पीडित मुलगी पोलिसात गेल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी न करता पोलिसांनी तिला घरी पाठवले होते. दुसर्‍या दिवशी पुन्हा ती पोलिसांत गेली होती. त्या दिवशी तिच्या घरी जाऊन त्या दोघांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली.

sanjay raut
Sanjay Raut : एक वादग्रस्त फोटो अन् राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक एस. बी. फुलारी यांच्या आदेशाने एका सहायक पोलिस निरीक्षकासह एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

sanjay raut
Sanjay Raut : अत्याचार पीडितेचा फोटो ट्विट केलेल्या राऊतांवर काय कारवाई होणार? जाणून घ्या...

या प्रकरणात पोलिस निरीक्षकांचा हलगर्जीपणा आहे का, याची पडताळणी उपअधीक्षक विशाल हिरे हे करीत आहेत. दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी विस्कळीत झाली आहे, हे दाखवण्यासाठी संजय राऊत यांनी त्या अल्पवयीन पीडित मुलीचा हल्ला झाल्यानंतरचा फोटो ट्विट केला होता. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com