'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं'; संजय राऊतांचे पुन्हा ट्विट 

टीम ईसकाळ
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सध्या महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला असून, भाजप व सेना दोन्हीही पक्ष वाटाघाटीच्या तयारीत दिसत नाहीत. भाजप व शिवसेना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. सध्या ते माध्यमांमध्ये रोज झळकत आहेत. महायुतीच्या जागावाटपाबद्दल आणि मुख्यमंत्री बदाबाबद दररोज काही ना काही वक्तव्य ते करत आहेत. आज (ता. 5) पुन्हा एकदा ते चर्चेत आले ते म्हणजे त्यांनी केलेल्या हटके ट्विटमुळे!

संजय राऊतांची सोशल मीडियावर धूम; मिम्सचा पाऊस!

संजय राऊत यांनी आज दुष्यंत कुमार यांची एक कविता शेअर केली आहे. 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए| मेरे सीने में नहीं तो तेरे सीने मे सहीं हो कहीं भी आग, लोकिन आग जलनी चाहिए|' अशी ही कविता आहे.  

सध्या महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला असून, भाजप व सेना दोन्हीही पक्ष वाटाघाटीच्या तयारीत दिसत नाहीत. भाजप व शिवसेना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि शिवतीर्थावर शपथ घेईल असे सांगितलेले आहे. तसेच त्यांनी आमच्याकडे 175 चा आकडा असल्याचेही म्हटले आहे.

सोशल मीडियावर फक्त संजय राऊत यांचीच चर्चा; मिम्सचा धुमाकूळ

संजय राऊतांच्या सगळ्याच ट्विट्सची चर्चा!
गेले काही दिवस संजय राऊत सातत्याने काही ना काही सूचक ट्विट करत आहेत. मागील आठवड्यातच त्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ व हाताचा उघडलेला पंजा असे कार्टून ट्विट केले होते. तर 1 नोव्हेंबरला 'साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी मला जे योग्य वाटते तसे मी ट्विट करतो असे उत्तर दिले होते. आजच्या त्यांच्या या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweets a poem of Dushyant Kumar