राज्यपालांपुढे शिवसेनेची भूमिका मांडणार : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही.

मुंबई : राज्यपालांची आम्ही आज भेट घेणार असून, ही राजकीय नसून सदीच्छा भेट आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा करणार असून, शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार

भाजप आणि शिवसेना यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने सत्तेत कोण येणार हे अद्याप निश्चित नाही. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून दररोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि शिवतीर्थावर शपथ घेईल असे सांगितलेले आहे. तसेच त्यांनी आमच्याकडे 175 चा आकडा असल्याचेही म्हटले आहे.

इथं माझं मला पडलंय, आठवलेंनाच मुख्यमंत्री करा : उदयनराजे

संजय राऊत म्हणाले, की शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही सायंकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेणार आहोत. ही राजकीय भेट नसून, सदीच्छा भेट आहे. राज्यपाल महाराष्ट्राचे पालक आहेत. त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करणार आहे. तरुण भारत हे वृत्तपत्र आहे का? उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून, त्यानंतर त्यांना भेटणार आहे. राज्यपाल हे एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्याशी आमचे जुने संबंध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut will meets Governor Koshiyari