Modi Cabinet : शिवसेनेला दुय्यम वागणूक नाही: संजय राऊत

sanjay raut
sanjay raut

मुंबईः नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला चांगले खाते मिळण्याची आशा होती. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. या खातेवाटपात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळालेली नसून, आम्ही पूर्ण समाधानी आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

शिवसेनेला रेल्वे, उर्जा आणि नागरी उड्डाण या खात्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यापैकी एकही खातं न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. राऊत म्हणाले, 'शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रीपद मिळाले आहे. याबाबत कोणतीही नाराजी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला जे खातं दिले आहे, त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत.'

शिवसेनेच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रीपद आले आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या वाट्याला महत्त्वाचे पद येईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद दिले गेल्याने शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नाही या चर्चा फक्त प्रसारमाध्यमं घडवून आणत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला जो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायचा होता तो आम्ही दिला आहे.

खातेवाटपापूर्वी शिवसेनेला रेल्वे खातं, उद्योग, नागरी उड्डाण ही तीन खाती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न होता पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला 2014 प्रमाणेच अवजड उद्योग खातं आले आहे. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य पुन्हा रंगणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आम्ही नाराज नाही, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणत संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com