Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळताच ठाकरे पिता पुत्रांचे हटवले फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळताच ठाकरे पिता पुत्रांचे हटवले फोटो

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.

याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याचे दिसून येत आहे.

संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो भिंतीवरून हटवण्यात आले आहेत. त्याऐवजी आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे लावण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला त्यानंतर आता हा बदल दिसून आला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आधीच्या रचनेतून या दोघांचे फोटो काढण्यात आले आहेत.