राज ठाकरेंचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी झिडकारला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे युतीसाठी ठेवलेला प्रस्ताव झिडकारला आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी (ता. 29) मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चाही केली होती. परंतु, युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव आलेला नसून, आपण कोणाशीही युती करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आपण पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरलो असून, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. दहा महापालिका व सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत असून, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार आहोत, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि मनसेतील आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव फेटाळल्याने युतीच्या शक्यता मावळल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-मनसे महापालिकेत एकत्र येणार का, अशी चर्चा होती. त्यातच आता नांदगावकर यांनी थेट "मातोश्री'ची पायरी चढल्याने या चर्चांना एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे. मात्र, उद्धव यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती तुटली, त्या वेळी मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा जोरात रंगली होती. राज- उद्धव यांच्यात प्रत्यक्षात फोनवर चर्चाही झाली होती. मात्र, दोन्ही बंधूंच्या मनोमिलनाचा निर्णय होऊ शकला नव्हता.

Web Title: shivsena rejects proposal of alliance with mns