गृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच हे महामंडळ कार्यान्वित होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळात गृहनिर्माणमंत्री आणि अशासकीय व्यक्तींचाही समावेश असेल. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांच्या योजना राबवण्यासाठी म्हाडा, एसआरए प्राधिकरणाचा आवाका कमी पडत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांचे अधिकार कमी करण्यासाठी महामंडळाचा घाट घातला जात असल्याचा आरोप परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. गृहनिर्माण राज्यमंत्रिपद शिवसेनेकडे असताना त्यांचा महामंडळात समावेश नसल्याने शिवसेनेत नाराजी असल्याचे रावते यांच्या वक्‍तव्यावरून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Shivsena resentment from Housing Corporation