
Shivsena Row : नाव व चिन्ह जायची कुणकूण लागली अन् उद्धव ठाकरेंनी पक्षनिधी वळवला; फडणवीसांच्या भावाचा दावा
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आता दोन्हीही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंबद्दल एक महत्त्वाचा दावा केला जात आहे. हा दावा देवेंद्र फडणवीस यांचे बंधू संजय फ़डणवीस यांनीही केला आहे.
संजय फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार याची कुणकुण उद्धव ठाकरेंना आधीच लागली होती. शिवसेनेच्या पक्षनिधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो, हे ओळखून पक्षनिधीची रक्कम अन्य बँक खात्यात वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षनिधी सुमारे १५० कोटींचा असण्याची शक्यता आहे".
शिवसेनेतला शिंदे ठाकरे संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. तिथून जेव्हा चेंडू निवडणूक आयोगाकडे आला तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. त्यानंतर हा नवा दावा केला जात आहे.