'द रिअल काश्मीर फाईल' म्हणत संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

काश्मीरी पंडितांच्या वाढत्या हत्यांनंतर अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रावर हल्लोबोल करण्यास सुरुवात केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSakal

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मीर पंडितांच्या हत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खोऱ्यातील वाढत्या घटनांनंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या मुद्द्यावरून केंद्रासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काश्मीरी पंडितांच्या वाढत्या हत्यांनंतर अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रावर हल्लोबोल करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वामध्ये आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील ट्वीट करत केंद्रवर हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी काश्मीर खोऱ्यातील काश्मीर पंडितांच्या हत्यांचा घटनाक्रम असलेला फोटो शेअर केला असून त्याला 'द रिअल काश्मीर फाईल' असे कॅप्शन दिले आहे. (Sanjay Raut Tweet On Kashmir Pandit Killing Issue)

असदुद्दीन ओवैसींनी करून दिली १९८९ ची आठवण

तर, दुसरीकडे काश्मीर (kashmir) खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना असदुद्दीन ओवैसींनीदेखील केंद्रावर ताशेरे ओढले आहेत.एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला जबाबदार धरत १९८९ ची आठवण करून दिली आहे. (Asaduddin Owaisi targets central government over target killings) मोदी सरकार इतिहासातून धडा घेत नाही आहे. सरकार १९८९ सारखीच चूक करीत आहे. १९८९ मध्येही राजकीय आउटलेट बंद करण्यात आले आणि खोऱ्यातील राजकारण्यांना बोलू दिले गेले नाही. तीच चूक ते करीत आहेत, असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विटमध्ये पलायनाचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.

Sanjay Raut
''काश्मीरी पंडितांची जबाबदारी असणारे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त''

१९८७ च्या निवडणुकीत हेराफेरी झाली आणि त्याचा परिणाम १९८९ मध्ये दिसला होता. काश्मिरी पंडितांना माणूस म्हणून नव्हे तर निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाहतात. स्थानिक राजकारण्यांना ते बोलू देत नाहीत. अशा गोष्टी दहशतवादाला वाव देत आहेत. याची जबाबदारी मोदी सरकारवर आहे, मी त्याचा निषेध करतो, असेही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com