खेळ आता सुरु झालाय! पंतप्रधान कार्यालयाकडे दिलेत पुरावे - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता थेट पंतप्रधान कार्यालयाला आपण पुरावे पाठवल्याचा दावा केला आहे.

खेळ आता सुरु झालाय! पंतप्रधान कार्यालयाकडे दिलेत पुरावे - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून खेळ तर आता सुरु झाला असं ट्विट केलं आहे. यात त्यांनी सांगितलं की, विशिष्ट पद्धतीने काही व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास संस्थांचा चुकीचा वापर होत आहे. एजंटच्या माधअयमातून जबरदस्तीने वसुली केली जात असून यात काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आता या संदर्भात आपण पंतप्रधान कार्यालयाकडे पुरावे दिले असल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.

सजंय राऊत यांनी ट्विटरवर म्हटलं की, खेळ आता सुरु झालाय! केंद्रीय संस्थांचा गैरवापर कशापद्धतीने काही व्यक्तींविरोधात केला जातोय याबाबतचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिले आहेत. काही अधिकारी वसुली एजंटच्या माध्यमातून जबरदस्तीने वसुली आणि ब्लॅकमेल करत असल्याचं या पुराव्यांमध्ये दिसत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच अधिक माहिती देण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली.

हेही वाचा: मराठा आरक्षण मान्य झालेल्या मागण्या; जाणून घ्या एका क्लिकवर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याआधीही अनेकदा आरोप केला आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून राजकीय विरोधकांवर दबावासाठी वापर केला जातो. याआधी पत्रकार परिषदेत राऊत यांनी काही नेत्यांवर घोटाळ्याचे आणि भ्रषाचाराचे आरोप केले होते.

Web Title: Shivsena Sanjay Raut Twitter Submit Evidence To Pmo About Central Agencies Misuse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..