फडणवीसजी, आता ही वृत्ती बदला : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

फडणवीसजी, शक्यतो मी कोणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नाही. जगातील सर्वांत शक्तीशाली अशा महिला या बांगड्या परिधान करतात. राजकारण चालतच राहिल मात्र, अशारितेने कोणाचा अपमान करणे योग्य नाही. आपण ही वृत्ती बदलायला हवी.

मुंबई : देवेंद्र फडणवीसजी मी शक्यतो कोणाच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळतो. मात्र, तुम्ही केलेल्या बांगड्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणे योग्य ठरेल. मुळात एका माजी मुख्यमंत्र्यांनी असे बोलणे योग्य नाही, आपल्याला ही वृत्ती बदलायला हवी, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी 100 कोटी नागरिकांवर 15 कोटी भारी असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करत तुम्ही बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही घातलेल्या नाहीत. आम्ही त्यांना उत्तर देऊ. भाजपमध्ये ही ताकद आहे. या टीकेवरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

आदित्यने ट्विट करत म्हटले आहे, की फडणवीसजी, शक्यतो मी कोणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नाही. जगातील सर्वांत शक्तीशाली अशा महिला या बांगड्या परिधान करतात. राजकारण चालतच राहिल मात्र, अशारितेने कोणाचा अपमान करणे योग्य नाही. आपण ही वृत्ती बदलायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Shivsena leader Aditya Thackeray targets Devendra Fadnavisleader Aditya Thackeray targets Devendra Fadnavis