
मुंबई- निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रतच नाही तर देशामध्ये भारतीय जनता पक्ष दंगली घडवतील, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं. लोकालोकांमध्ये तेढ निर्माण करायचं, जातीय भेद निर्माण करायचा अशी सरकारची निती असल्याची टीका राऊत यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सातारा येथे दोन गटात झालेल्या संघर्षाच्या संदर्भात ते बोलत होते.
अपात्र आमदारांबाबत सुनावणी १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. याविषयी संजय राऊत यांनी भाष्य केलं.विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत सुनावणी घेऊन निर्णय द्यायला पाहिजे होता. पण, संविधान, कायदा, नियम धाब्यावर बसवून हा उशीर केला जात आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा व्हिडिओ पाहिला. पॅरिसच्या विद्यापीठात मुलाखती दरम्यान ते बोलत होते. भाजपचा हिंदूत्वाशी काही देणं-घेणं नाही, असं ते म्हणाले. मी त्यांच्याशी सहमत आहे. इंडिया चा भारत करणे, लोकांमध्ये भेद निर्माण करणे. हे हिंदूत्व नाही. आम्ही कायम सुधारणावादी नितीचा वापर केला आहे. त्यांना मागे जायचं असेल तर ते त्यांचं हिंदूत्व नाही, असं संजय राऊत म्हणाले.
बबन घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र नक्कीच पाठवलं आहे. यावर निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंचा आहे. ते मुंबईला येत आहेत. ५० वर्षांपासून ते पक्षासोबत आहेत. त्यांचा मुलगाही आमदार राहिला आहे. मुलगीही महापौर राहिल्या आहेत. पक्षाने आणखी काय त्यांना द्यायला हवं. शिर्डीमधून आम्ही त्यांना लोकसभा उमेदवारी घोषित केली होती. पण, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. याचा पक्षाचा काय दोष आहे, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)