Dasara Melava: एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च

दादरच्या शिवाजी पार्कात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे.
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Teaser Balasaheb Thackeray Shivaji Park
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Teaser Balasaheb Thackeray Shivaji Parkesakal

दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होता आहे. ( Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Teaser Balasaheb Thackeray Shivaji Park )

दादरच्या शिवाजी पार्कात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच पत्रकार परिषद घेत राज्यभरातील शिवसैनिकांना शिस्तीने आणि वाजत-गाजत येण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नुकतंच शिवसेनेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवर दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! अशी कॅप्शनदेखील देण्यात आली आहे. एक मैदान हा कॅप्शनमधील उल्लेख लक्षवेधी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो…, हाी त्यांची भाषणाची सुरूवात यात दाखवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे. दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com