शिवसेनेला हवी होती ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - नगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा गौप्यस्फोट पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी केला. या आघाडीसाठी आपण स्वत: ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असा दावाही कदम यांनी केला.

नगरमध्ये भाजपने ‘राष्ट्रवादी’च्या मदतीने महापौरपद मिळवले. नगरमधील भाजप-‘राष्ट्रवादी’च्या अभद्र युतीमुळे दोन्ही काँग्रेससह शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजपला समर्थन देण्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाबद्दल ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, ‘राष्ट्रवादी’ने आपल्या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

नगरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’सोबत चर्चा सुरू होती, अशी खळबळजनक माहिती पत्रकारांशी बोलताना कदम यांनी दिली. ‘‘नगरमधील निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपसोबतच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘राष्ट्रवादी’चे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,’’ अशी टीकाही कदम यांनी केली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच ‘राष्ट्रवादी’ने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर ‘राष्ट्रवादी’ आमची जागा घेईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shivsena wanted the alliance with the NCP says ramdas kadam