शालेय सहलींसाठी "शिवशाही'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुंबई - एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधले जात आहेत. यापुढे शालेय सहलींसाठी वातानुकूलित शिवशाही बस सवलतीच्या दरात देण्याचा विचार महामंडळ करीत आहे. एसटीच्या "ऑफ सीझन'मध्ये कमाईसाठी शालेय सहलींसह एक दिवसाच्या कार्यक्रमांसाठी बस भाड्याने दिल्या जातात. एसटीच्या साधारण बस अस्वच्छ असल्याने बहुतांश शाळा सहलींसाठी खासगी बसला पसंती देतात. हे लक्षात घेता त्यांना "शिवशाही'चा वातानुकूलित आणि अत्याधुनिक पर्याय पुढे केला जाणार आहे. त्याला खासगी शाळांकडून प्रतिसाद मिळून ऑफ सीझनमध्ये कमाई होण्याची एसटीला आशा आहे. 

Web Title: Shivshahi bus for school trips

टॅग्स