मुंबई-अक्कलकोट मार्गावर शिवशाही शयनयान बससेवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

मुंबई : मुंबई-अक्कलकोट (जि. सोलापूर) मार्गावर एसटी महामंडळाची "शिवशाही शयनयान' बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. महामंडळाने माफक दरात ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता निघेल. 

पुणे, सोलापूरमार्गे अक्कलकोटला पहाटे साडेचार वाजता पोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस अक्कलकोटवरून रात्री साडेनऊ वाजता निघेल. बसचा तिकीट दर एक हजार 40 रुपये इतका आहे. बसमध्ये मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग प्लग, उशी, ब्लॅंकेटसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगरोधक यंत्रणा, सीसी टीव्ही कॅमेरा या सुविधाही आहेत.

प्रवाशांना बसचे आगाऊ आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच एसटी महामंडळाने नव्याने तयार केलेल्या msrtc reservation app द्वारेही प्रवासी स्मार्ट फोनवरून आरक्षण करू शकतात. 

Web Title: Shivshahi Shayanan Bus Service on Mumbai Akkalkot Road