पायाभरणीला गालबोट

पायाभरणीला गालबोट

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा बुडून मृत्यू झाला.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा प्रारंभ आज दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला होता. यासाठी गेट वे ऑफ इंडियावरून पत्रकार, अधिकारी, नेते व कार्यकर्ते यांना घेऊन बोटींचा ताफा निघाला होता. तीन बोटी एकामागोमाग जाणार होत्या. त्यापैकी अधिकारी, कार्यकर्ते व काही पत्रकार स्पीड बोटीने रवाना झाले. सुसाट वेगाने जाणाऱ्या या बोटीच्या चालकाला समुद्रातील खडकाचा अंदाज आला नाही. त्या खडकाला बोट धडकून फुटली. बोटीत पाणी भरू लागल्याने बोट पूर्णपणे कलंडली व बुडू लागली. काही जणांनी पाण्यात उड्या मारल्या. यात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव, अतुल खानवलकर यांच्यासह काही पत्रकारही होते.

मदतीला बोट धावली
बोट बुडू लागल्याने एकच हलकल्लोळ उडाला. कोस्ट गार्ड व मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकाला संपर्क केला; मात्र मदतीसाठी पंचवीस मिनिटे कोणीही पोचू शकले नाही. डॉल्फिन नावाच्या एका स्पीड बोटीने या सर्वांची सुखरूप सुटका केली.
या अपघातानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर केले. शिवस्मारकाच्या कामाचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. आजपासून कंपनी शिवस्मारकाचे काम सुरू करणार होती. 

दरम्यान, या अपघाताने काहीजणांना धक्‍का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एक जण बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच आमदार राज पुरोहित यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सुरक्षा व सुटका यासाठी संपूर्ण यंत्रणेला सूचित  केले.

असा झाला अपघात
बोटचालकाचा मार्गाचा अंदाज चुकला
अंदाज न आल्याने समुद्रातील खडकाला धडकून बोट फुटली
वीस जणांची क्षमता असलेल्या बोटीत २४ जण
धोका असलेल्या मार्गावरून बोट नेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
अपघातानंतर सुमारे २५ मिनिटे मदत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com