न्यायालयात चित्रीकरण करणाऱ्यांविरुद्ध याचिका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - उच्च न्यायालयातील सुनावणीचे मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्यांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. 

मुंबई - उच्च न्यायालयातील सुनावणीचे मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्यांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. 

बॉम्बे बार असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी (ता. 17) सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या न्यायालयात एका व्यक्तीला न्यायालयाच्या सुनावणीचे व्हिडिओ शूटिंग करताना एका वकिलाने पकडले होते. त्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल मंगेश पाटील यांनी कोर्टरूममध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असल्याचा आदेश जाहीर केला. मोबाईल फोनबरोबरच कॅमेरा आणि रेकॉर्डिंग करणारी इतर उपकरणेही कोर्टरूममध्ये घेऊन जाता येणार नाहीत. उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांना या नियमातून वगळण्यात आले आहे. 

Web Title: Shot against a court petition