आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला मिळाले फक्त एवढेच उत्पन्न

अभय जोशी
रविवार, 5 जुलै 2020

‘आयआरबी’कडून ११ लाख रुपये 
आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला दरवर्षी ‘आयआरबी’ कंपनीकडून देणगी दिली जाते. यंदा या कंपनीकडून ११ लाख रुपये देणगी धनादेश जमा करण्यात आला. अन्य काही भाविकांनीही देणगी दिली. याशिवाय अन्नछत्र कायम स्वरूपी ठेव योजनासाठी ऑनलाइनद्वारे ६६ हजार रुपये जमा झाले. महानैवेद्य योजनेसाठी ऑनलाइन ३० हजार रुपये जमा झाले तर तीन लाख ४२ हजार ७१२ रुपये ऑनलाइन देणगी जमा झाली. एकूण १६ लाख १५ हजार ८६० रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहे.

पंढरपूर - आषाढी यात्रेत मागील वर्षी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून तब्बल चार कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा कोरोनामुळे आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला केवळ १६ लाख १५ हजार ८६० रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर १५ जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात आठ दिवस लाखोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. भाविकांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या चरणाजवळदेखील मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होत असते. २०१८ मध्ये श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला आषाढी यात्रा काळात दोन कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ एवढे उत्पन्न मिळाले होते.

Image may contain: one or more people and people standing

राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा!

२०१९ मधील आषाढी यात्राकाळात त्यामध्ये एक कोटी ४४ लाख ९३ हजार १४५ रुपयांची वाढ होऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला तब्बल चार कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा आषाढी यात्रा भरू शकली नाही. 

कोरोनामुळे भाविकांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Vitthal Rukmini Mandir Samiti got only this amount due to not being able to complete Ashadi Yatra