पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत राहणार बंद 

अभय जोशी 
Friday, 31 July 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन वाढविला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 

हेही वाचा : अखेर... श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन वाढविला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 
ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 

हेही वाचा : जिल्हाधिकारी म्हणाले, "येथील' कोरोना रुग्णांवर टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार होणार उपचार 

मात्र "श्रीं'चे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्षांची प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवश्‍यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घेणे आवश्‍यक आहे. वारकरी सांप्रदायाचे "श्रीं'च्या नित्योपचारांबरोबरच अन्य प्रथा-परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते. ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी "श्रीं'ची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथंपर्यंतचे सर्व उपचार पूजा परंपरेनुसार करण्यात येत आहेत. 
तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांशी विचारविनियम करून 31 ऑगस्टपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला ,असे 
सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Shri Vitthal-Rukmini Temple in Pandharpur will remain closed till August 31