Shrikant Shinde: मुंब्रा जिंकण्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा नवा प्लॅन

आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे.
 Shrikant Shinde
Shrikant Shinde

आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशात ठाण्यात शिंदेंचा चांगलाच जम आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा मतदारसंघ ठाण्यात येतो. त्यामुळे मुंब्रा जिंकण्यासाठी शिंदे खास प्लॅन आखात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ( Shrikant Shinde Mumbra jitendra awhad election Maharashtra Politics)

सकाळ माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी मुंब्रा मतदारसंघावर भाष्य केलं आहे. यावेळी मुंब्रा मतदारसंघ जिंकण्यासाठी काय तयारी केलीय असा सवाल उपस्थित केला असता श्रीकांत शिंदे मिश्किलपण हसले आणि उत्तर दिले.

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मला वाटतं येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रत्येक मतदारसंघात चांगलं काम झालं पाहिजे. त्यामध्ये जी आपली पक्षसंघटना आहे ती वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही काम करत असतो. पुर्ण ताकदीनिशी लढण्याचं काम आम्ही करु. अस श्रीकांत शिंदे म्हणाले.

 Shrikant Shinde
मंत्री संदीपान भुमरे फक्त 8 दिवस पालकमंत्री राहणार; माजी खासदाराचा मोठा गौप्यस्फोट | Chandrakant Khaire

तसेच, आमदार होण्याचा काही विचार आहे का असं विचारलं असता, येणारा काळामध्ये अजून पर्यंत असा कोणता मानस नाही की मुंबईत परत येण्याचा विचार नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. माझा मतदारसंघ आहे तिथं मला चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली ९ वर्ष मी काम करत आहे. मोठं काम मी उभा करु शकलो आहे. असही शिंदे यावेळी म्हणाले.

तर दोन दिवसांपूर्वी, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यासंदर्भात श्रीकांत शिंदे यांनी सवाल उपस्थित केल. तर यावर मातोश्रीचा दरारा कमी झाला आहे असं स्पष्ट शब्दात उत्तर शिंदेंनी दिलं. काहीही घडलं तरी लोकं मातोश्रीवर जात होते. मात्र, मातोश्रीचा दरारा सर्व राजकीय घडमोडींमुळे कमी झाला आहे.

 Shrikant Shinde
Maharashtra Politics: पवारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले, राहुल गांधी म्हणाले...

ही परिस्थिती का बदलली त्याचे आत्मचिंतन या लोकांनी केलं पाहिजे. राष्ट्रवादी आणि मविआ यांच्यातील समीकरण पाहता वेट अँड वॉचची भूंमिका घेतली पाहिजे. कोणीतरी सिल्व्हर ओकवर गेलं आहे. भविष्यात कोण कुठे कुठे जातील हे पाहिले पाहिजेल. उद्या काय होईल ते जनता ठरवत असते. उद्या काय होईल हे सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com