परीक्षेसाठी सज्ज व्हा...! 

शुभंकर कणसे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

या गोष्टी विसरू नका

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि वेळेत अभ्यासाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते वरदानच ठरते. 

मित्रांनो, प्रशासकीय सेवेत जायचेय, समाजसेवा, प्रतिष्ठा आणि कौशल्य यासाठी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना हे वर्ष महत्त्वाचे आहे. एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक, फौजदार, सहायक पदापासून राज्यसेवेच्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी पदापर्यंतच्या सर्वच पदांना गवसणी घालायची आहे, अशी इच्छा मनोमन बाळगून राज्यातील 90 टक्के ग्रामीण भागातील उमेदवार सध्या तयारी करीत आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे; पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. क्‍लासेसमध्ये आर्थिक कारणांमुळे आणि गावाकडील स्थितीमुळे प्रवेश घेता येत नाही, अशी स्थिती असलेल्या उमेदवारांसाठी काही महिन्यांपासून शिवनेरी फाउंडेशनने विद्यार्थिप्रिय "स्मार्ट किट' महाराष्ट्रात उपलब्ध करून दिले आहे. 

गेल्या काही दिवसांत यूट्यूब चॅनेलवर केली जात असलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष "एमपीएससी स्मार्ट किट' घेण्याकडे वाढलेला कल लक्षात घेता सांगण्यास आनंद वाटतो, की अनेक उमेदवारांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये शिवनेरी ऍकॅडमीने केलेली अभ्यासाची सरळ साधी रचना यामुळे उमेदवारांचाही विश्‍वास बळकट झालेला आणि मी या अभ्यासक्रमाच्या मदतीने माझे स्वप्न पूर्ण करू शकतो, हा आलेला आत्मविश्‍वास आमच्यासाठीही खूप महत्त्वाचा संदेश बनला आहे. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवनेरीच्या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे, जे यापूर्वी उमेदवारांना कोठेही मिळालेले नाही. यामध्ये सर्व विषय समाविष्ट आहेत. प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आले आहेत. अनेक मुद्दे यापूर्वी वाचण्यात आलेले नव्हते, असेही असल्याने हा अभ्यासक्रम जणू वरदान ठरल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले. 

हे खरेच आहे, की शिवनेरीच्या स्मार्ट किटच्या माध्यमातून तुम्ही यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकता व अभ्यास करू शकता, त्यामुळे आर्थिक कारण किंवा वेळेचा प्रश्‍न आणि ज्यांना बाहेर पडता येणार नाही, घरीच अभ्यास करणे सयुक्तिक होणार आहे, अशांना समोर ठेवूनच या अभ्यासक्रमाची निर्मिती केली, ती फलश्रुत झाली असे वाटते. 

शिवनेरी फाउंडेशनने मुळात हा अभ्यासक्रम तयार करतानाच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा, विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण, निमशहरी भागांचा विचार करून सद्यःस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या अडचणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील यावर बारकाईने सर्वेक्षण केले. अत्यंत किफायतशीर दरात कोठेही, कधीही अभ्यास करता येईल, असे साधन तयार केले. अगदी गृहिणी, नोकरदारांसाठीही हे साधन खूप महत्त्वाचे ठरले. आज शहरांमध्ये ऍकॅडमिक व क्‍लासेसमध्ये सहभागी होणारे उमेदवार वगळता महाराष्ट्रात 90 टक्के असे विद्यार्थी आहेत, ज्यांना अशाच साधनांची गरज होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली. 

शिवनेरीने काय उपलब्ध करून दिले? 
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-1 व पेपर-2. (सर्व विषय) 
2. पीएसआय/एसटीआय/एएसओ पूर्व परीक्षा. (सर्व विषय) 
3. पीएसआय/एसटीआय/एएसओ मुख्य परीक्षा. (मराठी व इंग्रजी व्याकरण) 
4. तलाठी परीक्षा. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण) 
5. टॅक्‍स असिस्टंट. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण) 
6. खात्यांतर्गत फौजदार परीक्षा. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण) 
7. क्‍लेरिकल परीक्षा (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी + इंग्रजी व्याकरण) 
8. पोलिस भरती. (बुद्धिमापन + अंकगणित + मराठी) 

पीएसआय/एसटीआय/एएसओ पूर्व परीक्षा. (सर्व विषय) 
1. भूगोल (महाराष्ट्र, भारत व जग) 
2. इतिहास (महाराष्ट्र : प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक. आधुनिक भारत) 
3. सामान्य विज्ञान (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र) 
4. भारताची राजकीय व्यवस्था. 
5. अर्थशास्त्र. 
6. बौद्धिक चाचणी. 
7. अंकगणित. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे सर्व घटकावरील संपूर्ण संकल्पना समजावून देण्यासाठी व्हिडिओ लेक्‍चर्स, डिजिटल नोटसच्या स्वरूपात सर्व घटकांवरील परिपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हे सर्व व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना मोबाईल तसेच लॅपटॉप व कॉम्प्युटरवर म्हणजे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांनुसार पाहता येतात. यामध्ये 200 तासांचा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. अर्थात त्या-त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार तासांचा कालावधी कमी जास्त नमूद केलेला आहे. यामध्ये विविध परीक्षांमधील सर्व अभ्यासक्रम संकल्पनांसह समजावून सांगण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो. 

विचार करा मित्रांनो, व्हिडिओ लेक्‍चर्स म्हणजे दृकश्राव्य पद्धतीसाठी सर्व घटकांची परिपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आज आपण लाखो रुपये देतो. तरीही सर्वसमावेशक संपूर्ण माहिती उपलब्ध होईलच याची खात्री नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवनेरीच्या "एमपीएससी स्मार्ट किट'मुळे स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक घटक विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा समजून घेणे शक्‍य होऊन संकल्पनाही स्पष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासामध्ये वाढ झाली आहे. 

बरेच जण या स्मार्ट किटमुळे आत्मविश्वासपूर्ण अभ्यास करू लागले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आगामी स्पर्धा परीक्षा एक सुवर्णसंधी असल्याने ही संधी हातची जाऊ नये यासाठी आता जागे होण्याची, तयारीला लागण्याची व त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची काळाची गरज आहे. तुमची हीच गरज "शिवनेरीचे स्मार्ट किट' पूर्ण करेल यात शंकाच नाही, तेव्हा आता वेळ न दवडता शिवनेरीच्या स्मार्ट किट परिवारात सहभागी व्हा. जे आधीच आहेत, त्यांच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासाचे भागीदार तुम्हीही व्हा, एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो. 

येत्या रविवारी होणार ऑनलाइन चाचणी! 
शिवनेरी फाउंडेशन संपूर्ण राज्य स्तरावर राज्यसेवेचा पेपर एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर येत्या रविवारी (ता. 4 मार्च) ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरूनही देता येईल, फक्त ती ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करावा लागेल. 

यामध्ये राज्यसेवेच्या पेपर-1 व 2 या दोन्ही पेपरची ऑनलाइन चाचणी यामध्ये घेतली जाणार आहे. पेपर-1 मध्ये सामान्य ज्ञानाचा भाग असून, यामध्ये 100 प्रश्‍न असतील आणि यास प्रत्येकी दोन गुण असतील. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर-1 मध्ये पुढील विषय समाविष्ट असतील. 1) भूगोल (महाराष्ट्र, भारत व जग), 2) इतिहास (महाराष्ट्र : प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक. आधुनिक भारत), 3) सामान्य विज्ञान (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र), 4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या योजना, 5) पर्यावरण शास्त्र व जग, 6) भारताची राजकीय व्यवस्था. 

राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेतील पेपर-2 मध्ये 80 प्रश्‍न प्रत्येकी अडीच गुणांचे असतील. म्हणजे हा 200 गुणांचा पेपर असेल. 
पेपर-2 मध्ये 1) आकलन, 2) निर्णय प्रक्रिया व समस्या निर्मूलन, 3) सामग्रीचे आकलन, 4) तर्कशुद्ध युक्तिवाद (बौद्धिक चाचणीमध्ये समाविष्ट), 5) बौद्धिक चाचणी, 6) अंकगणित हे विषय असतील. 

दोन्ही पेपरमध्ये आयोगाप्रमाणे नकारात्मक गुणदान पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी गुगल क्रोम सुरू करून शिवनेरी पब्लिकेशनच्या www.shivneripublications.in या संकेतस्थळावर जाऊन "मॉक टेस्ट रजिस्ट्रेशन'वर क्‍लिक करावे. फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल व पत्ता बिनचूक भरावा. फॉर्म भरल्यानंतर सबमिट करावा. परीक्षेची तारीख व वेळ ई-मेल, व्हॉटसऍपवरून पाठविला जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विविध सुविधा पुढील दोन वर्षे पुरविल्या जातील. याचे गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: Shubhankar Kanse writes about MPSC exam