आफ्रिकेसोबतची विमानसेवा बंद करा; राजेश टोपे

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा बोट्स्वाना (बी.१.१.५२९) व्हेरिएंट आढळला. आतापर्यंतच्या व्हेरिएंटपैकी याचा प्रसार सर्वाधिक वेगाने होत असल्याचे समोर आले.
Rajesh Tope
Rajesh TopeSakal

जालना - दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा बोट्स्वाना (बी.१.१.५२९) व्हेरिएंट आढळला. आतापर्यंतच्या व्हेरिएंटपैकी याचा प्रसार सर्वाधिक वेगाने होत असल्याचे समोर आले. त्यामुळे या देशासोबतची विमानसेवा बंद करा, असे पत्र केंद्र शासनाने पाठवले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा बी.१.१.५२९ हा नवीन विषाणू आढळला. परंतु, त्याचा परिणाम तत्काळ देशावर किंवा राज्यात होणार नाही. दक्षिण आफ्रिकेतून पुण्या-मुंबईसह राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. दक्षिण आफ्रिका येथे नव्याने आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार अधिक असला तर या देशाची विमानसेवा बंद केलेली बरे. यासंदर्भात केंद्र शासनाला पत्र पाठविले आहे.’

Rajesh Tope
नव्या व्हेरिएंटची भीती नको, काळजी घ्या..

कोविड केंद्राच्या इमारतीचे विद्युत ऑडिट करा

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करून घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com