मुंबई - राज्यात रेशीम विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून, रेशीम शेतीला (तुती) कृषी पिकाचा दर्जा देतानाच पीकविम्याच्या यादीत त्याचा समावेश करण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात रेशीम संचालनालयाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. राज्यात जालना, सोलापूर येथे कोष बाजारपेठ उभारणी सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, बारामती, पूर्णा, जिल्हा परभणी येथे रेशीम कोष बाजारपेठ सुरू झाली आहे. अपारंपरिक रेशीम उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, राज्यात तुती व टसर रेशीम उत्पादन केले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे सांगतानाच पाटील म्हणाले, की भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे टसर रेशीम कोष बाजारपेठाची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत रेशीमच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.