...असा घडला गायिका गीता माळींचा थरारक अपघात (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

गेल्या दोन महिन्यांपासून माळी अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करत होत्या. ते कार्यक्रम आटोपून त्या गुरुवारी भारतात आल्या होत्या. 

इगतपुरी : नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांची गाडी गॅस टँकरला धडकल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये हा अपघात किती भयानक झाला हे दिसून येते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

माळी या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार (MH02 DJ 6488) मागून धडकली. यामध्ये माळी यांचा जागीच मृत्यू झाला.

- पंतप्रधानांनीच विश्‍वास गमवला  आता 'तुझे' काही खरे नाही...

हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला. अपघातात त्यांचे पती अॅड. विजय माळी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळी यांच्या अपघाती निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

- आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात? राष्ट्रवादीकडून पुरावा सादर

गेल्या दोन महिन्यांपासून माळी अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करत होत्या. ते कार्यक्रम आटोपून त्या गुरुवारी भारतात आल्या होत्या. मुंबई विमानतळावरून घरी परतत असताना नाशिक येथे मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील एकता हॉटेलसमोर त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

लाहे फाट्यानजीक रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात माळी यांची कार तेथेच उभ्या असलेल्या गॅस टँकरला पाठीमागून धडकली. त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

- Video: रणवीरची मिशी दीपिकाने हातात धरली अन्...

आठवड्यात दुसरी अपघाती दुर्घटना

माळी यांचा अपघात होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच याच भागातील हॉटेल परिवार गार्डनसमोर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कार (RJ.19. TA.8005) ने जोरदार धडक दिली होती. या अपघातातही दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Geeta Mali car accident CCTV footage is viral