कर्करोगमुक्त भारतासाठी गायक शानचा पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 मे 2017

मुंबई - भारतातील तरुणांना कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी 16 वर्षांच्या अनुज देसाईने पुढाकार घेतला आहे. त्याच्या "कर्करोगमुक्त भारत' या मोहिमेत प्रसिद्ध गायक शानही सहभागी झाला आहे. "नो स्मोकिंग' संकल्पनेवरील एक गाणे त्याने गायले आहे. या गाण्यात शानसोबत "व्हॉइस ऑफ इंडिया'मधील स्पर्धक प्रियांशी आहे.

शानने सांगितले, की हे गाणे माझ्या बालपणीची आठवण करून देणारे आहे. धूम्रपानामुळे माझे वडील वेळेआधीच मला सोडून गेले. त्यांच्या मृत्यूमुळे मला मोठा धक्का बसला. "नो स्मोकिंग पापा, बीकॉज आय लव्ह यू' असे घोषवाक्‍य असलेल्या या मोहिमेत अनुजसोबत त्याचे वडील तुषार देसाईही सहभागी झाले आहेत. तेही पूर्वी धूम्रपान करत असत. अनुजने अनेकदा आर्जवे केल्यानंतर त्यांनी धूम्रपान सोडले. आजीसारखे आपले बाबादेखील कर्करोगाने जातील, या भीतीने अनुजने त्यांना सिगारेट न ओढण्याची विनंती केली होती. तुषार देसाई याविषयी कळकळीने सर्वांना सांगत असत. ते पाहून अनुजने ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवायला सुरवात केली.

अंधेरी येथील रितुंबरा महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या अनुजचे स्वप्न साकारण्यासाठी त्याचे वडील, मित्र आणि आप्तेष्ट त्याला मदत करतात. अनुज म्हणाला, ""माझ्या एका सकारात्मक विचारावर सगळे एकत्र आले. प्रत्येक जण मला मदत करत आहे. माझे मित्र प्रीतेश-मितेश यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक शान यांनी ते गायले आणि महत्त्वाचे म्हणजे शानने या कामाचे पैसे घेतले नाहीत.''

Web Title: singer shan Initiative for cancerfree india